दलित चळवळीतील नेत्याकडुन शिवसेनेच्या कामगिरीचे कौतुक

दलित चळवळीतील बड्या नेत्याकडुन शिवसेनेच्या कामगिरीचे तोंड भरून कौतुक
दलित चळवळीतील बड्या नेत्याकडुन शिवसेनेच्या कामगिरीचे तोंड भरून कौतुक

दसरा मेळाव्यात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्व शिवसैनिकांचे लक्ष लागले होते तसेच विरोधकांचे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याकडे लक्ष लागले होते. दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे यांच्या भाषणामुळे प्रभावित झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्याने शिवसेना पक्ष बांधणीचे आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उद्धव नीतीचे तोंड भरून कौतुक केले आहे. त्यामुळे आज मित्र पक्षाबरोबर विरोधकांना सुद्धा उद्धव नीती पटायला लागली आहे.
दलित चळवळीचे नेते चंद्रकात जगताप यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कौतुक करताना काढलेले उद्गार……

” धार्मिकदृष्ट्या एकत्र आल्यावर सामाजिक आणि राजकीय यश मिळतेच हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातुन बघायला मिळाले. माझ्या सारखा आंबेडकरी विचांराचा सामान्य कार्यकर्ता जरी असलो तरी किती ही वैचारीक विरोधा असला तरी चांगल्या गोष्टींचा आदर हा करायलाच पाहीजे असे मी तरी मानतो. शिवसेनेच्या कोणत्याही सभेचे मेळाव्याचे योग्य नियोजन,स्टेजवरिल प्रोटोकाँल, निटनेटकेपणा, सभेला येणारा प्रत्येकजन स्वयंमस्फुर्तीने येत असतो. खोटी गर्दी नाही.पैसे देवुन लोकांना आणले जात नाही. सातत्याने काम करत राहणे यातच शिवसेनेचे राजकीय यश आहे. अस मला तरी वाटत. पक्ष संघटना चालवणार्यानी चांगल्या गोष्टी ह्या तरी स्विकारायलाच पाहीजेत” चंद्रकांत जगताप …

शरद पवारांना राज्यसभेवर पाठ्वण्याइतके सुद्धा संख्याबळ राष्ट्रवादीकडे नसेल – संजय काकडे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here