व्हॉट्सअ‍ॅपनंतर हॅकर्सची ‘या’ अ‍ॅप्सवर नजर

हॅकर्स | Hackers look at 'these' apps after WhatsApp

एकीकडे तंत्रज्ञानात प्रगती होत असताना त्याचे नव्याने धोकेही समोर येऊ लागले आहेत. ऑनलाइन फसवणूक, ब्लॅकमेलिंग ह्या सारख्या घटना आपणास नवीन नाहीत; सध्या असेच एक प्रकरण गेले काही दिवसात सर्वत्र चर्चेत होते ते म्हणजे व्हॉट्‌सऍप हॅकिंगचे.

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपनंतर आता काही मेसेजिंग अ‍ॅप्सना हॅकिंगचा धोका निर्माण झाला आहे. ‘टेलिग्राम’ आणि ‘सिग्नल’ या मेसेजिंग अ‍ॅपना याचा फटका बसू शकतो. टेलिग्रामवर व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे एंड-टू-एंड इनक्रिप्शनची सुविधा मिळत नाही. यासाठी सिक्रेट चॅट हे फीचर देण्यात आले आहे. त्यामुळे हे काही प्रमाणात सुरक्षित मानलं जातं.

असे होऊ शकते टेलिग्राम हॅक

मॅसचुसट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या एका रिपोर्टनुसार, टेलिग्राम अ‍ॅपमध्ये काही बग असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.
टेलिग्रामकडून स्वतःच्या मालकीच्या एमटी प्रोटो चा वापर केला जातो. याशिवाय कोणीही एमटी प्रोटो सर्व्हर सिस्टमचं नियंत्रण मिळाल्यास पूर्ण मेटाडेटासह इनक्रिप्टेड मेसेजही हॅक करू शकतं.
मॅसचुसट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या संशोधकांनी टेलिग्राम युजर्स सिक्रेट चॅट फीचरचा वापर करत असतील तरीही थर्ड पार्टीसाठी मेटाडेटा मिळवणं शक्य आहे असा दावा केला.

काही ठराविक गोष्टींची काळजी घेऊन आपण हॅकिंगपासून सहज वाचले जाऊ शकतो.

आपल्या संगणक, लॅपटॉप, मोबाइल किंवा इतर उपकरणांमध्ये चांगल्या दर्जाचा ‘अँटीव्हायरस’ जरूर इनस्टॉल केलेला असावा व तो वेळोवेळी अपडेट करावा.
मोबाइलवर आणि ई-मेलवर येणाऱ्या व नको असलेल्या लिंक्‍स उदा. तुमचे क्रेडिट कार्ड डिस्पॅच झाले आहे, माहिती बघण्यासाठी येथे क्‍लिक करा, लॉटरीचे बक्षीस घेण्यासाठी येथे क्‍लिक करा व इतर यांसारख्या लिंक्‍स वर कधीही क्‍लिक करू नका.
माहीत नसलेल्या नंबर/नाव यावरून येणारे भावनिक ई-मेल व मेसेजकडे दुर्लक्ष करा.
 प्ले-स्टोअरवरून कोणतेही ऍप डाउनलोड करताना ते अधिकृत आहे याची खात्री करा.
 अनोळखी नंबरवरून येणारे मिस कॉल विशेषतः आंतरराष्ट्रीय कॉल कधीही रिसिव्ह अथवा कॉलबॅक करू नका.
फेसबुक इंस्टाग्राम वरून येणारी अनोळखी व्यक्‍तीची’ फ्रेंड रिक्वेस्ट’ शक्‍यतो एक्‍सेप्ट करू नका.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here