निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया, पीडितेच्या कुटुंबाला १० दिवसात न्याय मिळाला……

न्याय | Nirbhaya's mother's response: The victim's family got justice in 7 days

हैद्राबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा खात्मा झाला आहे. तेलंगना पोलिसांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींचा जागीच एन्काऊंटर केला आहे. पोलिस चौघांनाही ज्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आलं, त्या घटनास्थळी घेऊन गेले होते. मात्र तिथे या चौघांनी पळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी या चारही आरोपींना जागीच संपवलं आहे.

तेलंगणा पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. तर निर्भायाच्या आईने दहा दिवसांत न्याय मिळाला, असे म्हणत पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले आहे. त्या म्हणाल्या की, पीडितेच्या कुटुंबाला दहा दिवसांत न्याय मिळाला, आमच्याप्रमाणे हैदराबादमधील पीडित कुटुंबाच्या वाट्याला संघर्ष आला नाही, याचं समाधान आहे.

असल्या गुन्हेगारांना अशीच शिक्षा केली पाहिजे. मात्र आपली न्याय व्यवस्था ही गुन्हेगारांना पोसत बसते. पोलिसांना अशा गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी मोकळीक दिली पाहिजे. अशाचं कारवाया करून असे गुन्हेगार संपवले पाहिजेत, असे म्हणत निर्भयाच्या आईने निर्भयालाही न्याय द्या, अशी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here