टाटा कंपनीच्या Tigor EV या इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी बुकिंग सुरु

टाटा मोटर्सने त्यांची लवकरच लॉन्च करण्यात येणारी Tigor EV या इलेक्ट्रिक कारसाठी बुकिंग सुरु करण्यात आली आहे. कंपनीने सामान्य नागरिकांसाठी ही कार निळ्या रंगात उपलब्ध करुन दिली आहे. यापूर्वीची कार ही फक्त फ्लीट ऑपरेटर्ससाठी होती. टाटाची ही इलेक्ट्रिक कार एकदा खरेदी केल्यानंतर 213 किमी अंतरचा पल्ला गाठू शकणार आहे. या कार खरेदीसाठी बुंकिंग करण्यासाठी 5 हजार रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. यामध्ये तीन वेरियंट असून XE+, XM+ और XT+ लॉन्च करण्यात आली आहे. तसेच या नव्या इलेक्ट्रिक कारसाठी बॅटरी रेंज वाढवण्यात आली आहे.

टिगोर ईवीची बुकिंग केल्यानंतर डिलिव्हरी सुद्धा सुरु करण्यात आली आहे. टिगोर ईवी XT+ वेरियंटची सुरुवाती किंमत 10.75 लाख, XE+ ची किंमत 10.44 लाख आणि XM+ ची किंमत 10.61 लाख रुपये आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, शहरातील नागरिकांसाठी ही कार उपयोगी ठरणार आहे. तसेच या कारची स्पीड 80 किमी प्रति तास आहे.

या कारच्या अन्य फिचर्सबाबत बोलायचे झाल्यासस याची लांबी 3,992 MM, रुंदी 1677 MM आणि उंची 1537 MM आहे. तसेच कारसाठी 21.5 Kwh ची बॅटरी देण्यात आली असून 40 बीएचपीची पॉवर आणि 105 एमएम टॉर्क जनरेट करु शकते. यामध्ये सिंगल स्पीड ऑटोमॅकानिक युनिट देण्यात आले आहे. त्यामुळे कार चालवताना कोणताही अडथळा येणार नाही.
या कारचे 80 टक्के चार्जिंग होण्यासाठी 12 तासांचा वेळ लागतो. टिगोर ईवीमध्ये स्टॅन्डर्ड सेफ्टी फिचर्ससाठी ट्वीन एअरबॅग देण्यात आले आहेत. तर सस्पेंशन आणि ब्रेक्स सामान्य वेरियंटचेच असणार आहेत. यामध्ये रेग्युलर स्टरियो आणि फॅब्रिक सीट, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल सिस्टम स्टॅडर्ड मिळणार आहे. तसेच कारमध्ये 14 इंचाचा अलॉय व्हील्ससह ट्युबलेस टायर देण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here