मुंबई महानगर पालिका भरणार ५२५५ पदे

मुंबई महानगर पालिका भरणार ५२५५ पदे

महाराष्ट्रात युवकांसाठी नव्याने रोजगार उपलब्ध होणार आहेत. मुंबई महापालिकेत महाभरती होणार असून लिपिक अर्थात कार्यकारी सहाय्यक पदाच्या ८७४ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार असून त्या अनुषगांने विद्यार्थ्यांना तयारी करावी लागणार आहे. परीक्षेच्या प्रक्रियेसाठी सुमारे १२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहेत.

या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवार यांच्याकडून ५०० रुपये शुल्क आकारण्यात येईल आणि मागासवर्गीय उमेदवारांकडून प्रत्येकी ३०० रु शुल्क आकारला जाणार आहे. एकूण ५२५५ कार्यकारी सहाय्यक वर्गाची पदे भरण्यात येणार आहे. त्या पदांपैकी सरळसेवा पद्धतीने ३२२१ पदे भरायची आहेत.

त्यातील सरळसेवेपैकी रिक्त असलेली ८७४ पदे भरण्यात येणार आहेत. सर्व उमेदवारांचे ऑनलाइन पद्धतीचे अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाइनच्या महारिक्रुटमेंट या वेबसाइटवर अपलोड केला जाणार आहे. महाराष्ट्रात बेरोजगारांची सख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामूळे मुंबई महापालिकेत भरल्या जाणाऱ्या पदांसाठी महाराष्ट्र भरातून हजारो अर्ज येण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here