येवले चहात भेसळ, उत्पादने बंद ठेवण्याचे आदेश….

d8fa6d04-1fc2-435a-8c22-189bcc0875b5\भेसळ

येवले चहामध्ये रंगाची भेसळ असल्याचे सिद्ध झाले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालात ही बाब सिद्ध झाली आहे. या रंगामुळेच चहाला लाल रंग येतो, हे येथे उल्लेखनीय. दरम्यान, येवले फूड प्रॉडक्‍टला उत्पादन बंद ठेवण्याचे आदेशही अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहेत. एफडीएने तपासणी केली असता, ‘येवले अमृततुल्य’ चहामध्ये रंग टाकण्यात येत असल्याची माहिती पुढे आली. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६अंतर्गत नियमबाह्य रंगाचा वापर करणे बेकायदेशीर आहे.

यापूर्वी, पुण्यातील कोंढवा भागातील कारखान्यात ‘मेलानाईट’ हा पदार्थ आढळल्याने येवले चहावर एफडीएतर्फे कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी काही नमुनेही जप्त करण्यात आले होते, मात्र, पहिल्या अहवालात चहामध्ये भेसळ निष्पन्न झाली नव्हती. आता, दुसऱ्या अहवालात या चहामध्ये ‘सिंथेटिक फूड कलर’ आढळून आला. येवलेकडून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या जाहिरातीमधील येवले चहा प्यायल्यावर पित्त होत नाही, चहासाठी मिनरल वॉटरचा वापर होतो, हे दावे खोटे असल्याचेही एफडीएने सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here