Skip to content Skip to footer

आशिष शेलारांना सध्या काही काम नाही, संपूर्ण भाजप पक्ष बेकार – ॲड. अनिल परब

आशिष शेलारांना सध्या काही काम नाही, संपूर्ण भाजप पक्ष बेकार – ॲड. अनिल परब

मुंबईकरांनी बालहट्टच पुरवायचे का?, असा खोचक सवाल शेलार यांनी केला होता. शेलार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर टीका केली होती. ‘पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला, असा आरोप त्यांनी सरकारवर केला होता. याच पार्श्वभूमीवर सेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना परब यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर जोरदार टिका केली.

‘आमदार आशिष शेलार यांना सध्या काही काम नाही. संपूर्ण भाजप पक्ष बेकार आहे. त्यामुळे खिजवणं, चिडवणं, टिंगलटवाळी करणे हे काम त्यांना उरले आहे. ज्या गोष्टी नीट समजत नाहीत त्यावर त्यांनी बोलू नये, असा सल्लाही परब यांनी शेलारांना दिला आहे. दरम्यान, आमची संकल्पना नाईट लाईफ नाही तर मुंबई २४ तास आहे. त्यांच्या आणि भाजपच्या डोक्यात “नाईट लाईफ” म्हणजे अय्याशी हेच आहे, ‘नाईट लाईफ’ ही अय्याशी नव्हे. दारू, पब, वेश्या व्यवसायासाठी रात्री परवानगी आम्ही दिलेली नाही, असेही अनिल परब यांनी स्पष्ट केले.

ठाकरे सरकार करणार मेगा भरती, भरणार ७०,००० सरकारी पदे

Leave a comment

0.0/5