हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील तरुणीने घेतला अखेरचा श्वास

011111111| Hinganghat-burning case

हिंगणघाट येथील प्राध्यापक तरुणीची आज ७ दिवसांनी मृत्यूशी झुंज संपुष्टात आली. राज्यातील सर्वांचे हृदय पेलावून टाकणाऱ्या घटनेतील पीडितेला ७ फेब्रुवारी पासून व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण यात त्यांना अपयश आले.
आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी ऑरेंज सिटी रुग्णालयात तिने शेवटचा श्वास घेतला. सकाळी तिचा रक्तदाब खालावत गेला यामुळे डॉक्टरांसोबतच सर्वांची धाकधूक वाढली होती, शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा डॉक्टरांना यात अपयश आले. तिच्या त्वचेला गंभीर इजा झाल्याने जंतुसंसर्ग वाढत गेला व रक्तदाब कमी झाल्याने तिला हृदय विकाराचा झटका येऊन तिची प्राणज्योत मालवली.
तिच्या मृत्यवर बोलताना घरच्यांसह अनेक राजकारणी नेत्यांनी कठोर कारवाईची मागणी केली व शोक व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here