Skip to content Skip to footer

१ एप्रिल पासून सरकारी कर्मचाऱ्यांची खाती राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्याचे आदेश

१ एप्रिल पासून सरकारी कर्मचाऱ्यांची खाती राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्याचे आदेश

राज्यातील पीएमसी बँक, एस बँक आणि ऍक्सिस बँक या मोठ्या बँकेचे घोटाळे बाहेर आल्यामुळे बँक ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या बँकेत सामान्य ग्राहकांप्रमाणे सरकारी संस्थेचे पैसे सुद्धा अडकलेले दिसून आले होते. या सर्व घडामोडीमुळेच राज्य शासनाने सार्वजनिक महामंडळांचे पैसे आणि ठेवी राष्ट्रीयकृत बँकेतच जमा कराव्यात, असा राज्य सरकारने आदेश जारी केला आहे. तसेच १ एप्रिलपासून खासगी तसेच सहकारी बँकेतील खाती बंद करण्यात येणार आहेत.

सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे आदींनी त्यांच्याकडील सर्व बँकिंग विषयक व्यवहार राष्ट्रीयकृत बँकांमार्फतच करण्यात यावेत. तसेच यापूर्वी खासगी अथवा सहकारी क्षेत्रातील बँकांमध्ये कोणत्याही शासकीय योजनांचा निधी जमा करण्यासाठी उघडण्यात आलेली बँक खाती १ एप्रिल २०२० पासून बंद करावीत व केवळ राष्ट्रीयकृत बँकांमध्येच खाती उघडावीत, असे या शासन परिपत्रकात म्हटले आहे.

त्यामुळे शासनाचे तसेच शाळकरी कर्मचाऱ्यांचा पैसा देखील आता सुरक्षित बँकेत जमा होणार आहे. तसेच या निर्णयाचा फटका अनेक बँकांना सुद्धा बसणार आहे.

Leave a comment

0.0/5