३१ मार्च पर्यंत परीक्षा पुढे ढकलण्याची राज्य शासनाची ‘एमपीएससी’ला विनंती.

३१-मार्च-पर्यतच्या-परीक्-Till-March-3rd

३१ मार्च पर्यंत परीक्षा पुढे ढकलण्याची राज्य शासनाची ‘एमपीएससी’ला विनंती.

राज्यात लवकरच एमपीएससीची परीक्षा होणार आहे. परंतु राज्यात निर्माण झालेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकार करणार आहे. या मागणीचा विचार करता गर्दी टाळण्यासाठी एमपीएससीची परीक्षा रद्द करण्याची विनंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला करण्यात येणार आहे. ही परीक्षा ३० मार्चनंतर घेण्यात यावी असं सुचवण्यात येत आहे. तसेच घरगुती, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम रद्द करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईच्या सूचना काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयातील रुग्णांना आरोग्य मंत्र्यांनी भेट दिली होती व माहितीचा आढाव घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वेळी बोलताना टोपे म्हणले, ‘ राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३२ वर पोहचली आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात ८० संशयित आहेत. रुग्णांना जेवण, टीव्ही, वायफाय सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत. रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांची तपासणीदेखील लवकर होणे गरजेचं आहे. त्यासाठी लॅब्सची क्षमता दुप्पट करण्याचाही प्रयत्न करत आहोत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here