कोरोना अपडेट : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याबाबत प्रशासकीय यंत्रणांना मंत्री एकनाथ शिंदें यांनी दिले आदेश.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास-To prevent Corona outbreak

कोरोना अपडेट : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याबाबत प्रशासकीय यंत्रणांना मंत्री एकनाथ शिंदें यांनी दिले आदेश.

राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, तसेच साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व जिल्हा यंत्रणेवर दिलेली असून, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे. कोरोनासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठकीचे आयोजन मंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

या बैठकीस जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार, पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, सर्व महानगरपालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार, सर्व नगरपालिका मुख्याधिकारी तसेच इतर प्रशासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

या आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनातील सर्वच घटकांनी मार्गदर्शक सूचनांनुसार आपापली जबाबदारी पार पाडावी. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच नागरिकांच्या आरोग्याला महत्व द्यावे. नागरिकांमध्ये भीती आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यांना मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून क्वॉरंटाईन केलेल्या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.

परिस्थितीजन्य निर्णय घेण्याचे सर्वाधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. प्रत्येक यंत्रणांनी वेळीच त्यांच्याकडून आलेल्या आदेशानुसार कार्यवाही करून प्रशासनाला अवगत करावे, अशी सूचना सुद्धा मंत्री महोदयांनी दिली होती.

कोरोना विषाणू परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी मिशनमोडमध्ये काम करणे गरजेचे आहे. सर्वच संशयितांची माहिती घेऊन त्याबाबतचे निर्णय घेण्यात यावेत, तसेच या काळात वैद्यकीय विभागांना प्रशासकीय सहकार्य करावे, यामध्ये वैद्यकीय अधिका-यांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रत्येकाला जी जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यानुसार त्यांनी वेळेवर आपली जबाबदारी पार पाडावी, असे मत व्यक्त शिंदे यांनी केले.

आवश्यक तेथे मागणीनुसार रुग्णवाहिका सेवा सुसज्ज ठेवण्यात याव्यात, वैद्यकीय साधन सामग्रीच्या मागणी व साठ्याबाबत आढावा घेण्यात यावा, वैद्यकीय विभागांना आवश्यक तेथे पोलीस विभागाने सहकार्य करावे. मास्क, सॅनिटायझर यांचा काळाबाजार होणार नाही, अशी दक्षता घ्यावी. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या ठिकाणी सॅनिटायजर, साबण आणि पाणी उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी. प्रत्येकाने स्वच्छता बाळगावी, अशा सूचना सुद्धा शिंदे यांनी केल्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here