Skip to content Skip to footer

कोरोना अपडेट : आपण सर्वजण मिळून युद्ध जिंकू – मुख्यमंत्री

कोरोना अपडेट : आपण सर्वजण मिळून युद्ध जिंकू – मुख्यमंत्री

कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील यांनी राज्याला संबोधित करुन खबरदारीचं आवाहन केलं. घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. हे ‘वॉर अगेन्स्ट व्हायरस’ आहे. आपण खबरदारी घेत आहात, पण आणखी खबरदारी घ्यायला हवी, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हा विषाणू हळूहळू पावलं पुढे टाकत आहे. आपण त्याला थोपवत आहोत. आपल्याकडचे रुग्ण सर्वजण बाहेरुन आलेले आहेत. गरज नसल्यास घरातून बाहेर पडू नका, बस, रेल्वेमधील गर्दी आणखी कमी करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. कोरोना हे एक युद्ध आहे. आपल्याकडे पुरेशा गोष्टी आहेत.

आपण घाबरु नका, सरकार तुमच्यासोबत आहे. युद्धाचा अनुभव फार वाईट असतो. पण युद्धासाठी आम्ही सज्ज आहोत, यंत्रणेवरील भार कमी करणं ही आपली जबाबदारी आहे, असे मुख्यमंत्री महोदय जनसंवादादरम्यान बोलले.

आताचं जे युद्ध आहे ते विषाणूसोबत आहेत. वॉर वर्सेस व्हायरस आहे. या विषाणूच्या संसर्गाविरुद्ध डॉक्टर, नर्स, बस ड्रायव्हर, सर्व अधिकारी आपल्यासाठी २४ तास लढत आहेत. जर ते आपल्यासाठी काम करत असतील तर आपण घरात राहू शकत नाही का? मी तुम्हाला आवाहन केले. मात्र सांगूनही अनावश्यक प्रवास होत आहे. शक्य असेल तर अजून प्रवास बंद करा. सर्व मंदिरं, दुकाने बंद केले आहेत. आपल्याकडे सुद्धा विषाणूचे रुग्ण वाढत आहेत, असे सांगून महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचित केले.

Leave a comment

0.0/5