कोरोनाशी लढा देण्यासाठी अनेक शहरे लॉक डाऊन – वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक शहरांमध्ये बंदचा पुकार..

अनेक शहरे लॉक डाऊन-Many cities lock down
ads

कोरोनाशी लढा देण्यासाठी अनेक शहरे लॉक डाऊन – वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक शहरांमध्ये बंदचा पुकार..

सध्या देशात आणि राज्यात कोरोना व्हायरसचे संकट उभे राहिलेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राज्यातील जनतेला खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उपाय योजना सांगितल्या आहेच. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरे लॉक डाऊन करण्यात आलेली आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूं व्यतिरिक्त सर्व दुकानं, सर्व ऑफिसेस ३१ मार्चपर्यंत बंद राहतील, असे आदेश दिले आहेत.

याच पार्श्वभूमीवर अन्नधान्य, दूध, औषधे यासारख्या अत्यावश्यक सेवा वगळता मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यासह जवळपास १० शहरांचे व्यवहार आजपासून पुढील १० दिवस ठप्प झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच सर्व शहरांमध्ये लॉक डाऊनची स्थिती पाहायला मिळाली आहे.

दरम्यान, सरकारी कार्यालयातील कर्मचारी ५० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आणली आहे. शक्य तिथे वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या खासगी कंपन्यांना ते शक्य नाही, त्या कंपन्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here