चीन अत्यंत गुप्त पद्धतीने वागतोय ट्रम यांची टीका – कोरोना संदर्भात ट्रम्प यांनी केले लक्षवेधक वक्तव्य.

चीन-अत्यंत-गुप्त-पद्धतीन-China-Very-Secret-Method

चीन अत्यंत गुप्त पद्धतीने वागतोय ट्रम यांची टीका – कोरोना संदर्भात ट्रम्प यांनी केले लक्षवेधक वक्तव्य.

देशात आणि जगभरात कोरोना या संसर्ग आजाराने अक्षरशः थैमान माजवले आहे. अनेक देशातील नागरिकांना याची लागण होऊन अनेकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रम यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्ष वर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

आपल्या देशात काय सुरु आहे हे चीनने लवकर सांगायला हवे होते. जोपर्यंत हे सार्वजनिक झालं नाही तोपर्यंत आम्हाला याची काहीच माहिती नव्हती. चीन अत्यंत गुप्त पद्धतीने वागतो आणि हे फार दुर्दैवी असल्याचं म्हणत ट्रम्प यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

मी चीनवर थोडा नाराज आहे. मी त्यांना मदतीसाठी काही लोक पाठवू का ? अशी विचारणा केली होती. पण त्यांना मदत नको आहे, हा त्यांचा अभिमान आहे. त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here