कोरोनाशी सामना करण्यासाठी आनंद महिंद्रा यांनी उचलले पाऊल.

कोरोनाशी-सामना-करण्यासाठ-To-face-to-face

कोरोनाशी सामना करण्यासाठी आनंद महिंद्रा यांनी उचलले पाऊल.

सध्या जगभरात आणि देशात कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. सर्वच देश या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी युद्ध पाळतीवर प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यातच भारतात कोरोना तिसऱ्या टप्प्यात पोहोचण्याच्या स्थितीत असल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. अशातच कोरोनावर मात करण्यासाठी महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना व्हेंटिलेटर्स बनवण्यापासून, महिंद्रा हॉलिडेजचे रिसॉर्ट्स देण्यासह स्वतःचं १०० टक्के वेतनही मदत म्हणून देणार असल्याचे आनंद महिंद्रा यांनी सांगितले आहे. याबाबत त्यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.

 

आमच्या महिंद्रा हॉलिडेजचे रिसॉर्ट्स ऑफर करण्यास तयार आहोत. तसेच आमची प्रोजेक्ट टीम तात्पुरती काळजी सुविधा केंद्र उभारण्यात शासनाला मदत करण्यास तयार आहे. आम्ही कोरोनामुळे फटका बसलेल्या छोट्या उद्योजकांच्या मदतीसाठी निधी उभारणार आहोत. त्यात मी माझे १०० टक्के वेतन मदत म्हणून देईल. याची घोषणा सुद्धा महिंद्रा यांनी ट्विटर वरून केलेली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here