कोरोना अपडेट – दिलासादायक बातमी, मुंबईत १२ रुग्ण निगेटिव्ह

कोरोना-अपडेट-दिलासादायक-Corona-update-comforting

कोरोना अपडेट – दिलासादायक बातमी, मुंबईत १२ रुग्ण निगेटिव्ह

एकीकडे राज्यात आणि देशात कोरोना रूग्णाच्या संख्येत वाढ होताना दिसत असताना, मुंबई शहरातून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील तब्बल १२ रुग्णांचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कस्तुरबा रुग्णालयातील १२ रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाले आहेत. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, गर्दीत जाऊ नये तसेच विषाणूची लागण झाल्यास थेट रुग्णालयात भरती व्हावं, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उप मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी केलंय.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here