Skip to content Skip to footer

उद्धवजी मानलं तुम्हाला..!!

उद्धवजी मानलं तुम्हाला..!!

कोरोना सारख्या संकटातही संयमी व झुंजार वृत्तीने लढा देत महाराष्ट्रावरील वाईट परिस्थिती संपवू पाहणारे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे…

सध्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये कोरोना या संसर्ग आजाराने हाहाकार माजविला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे वेळोवेळी राज्यातील जनतेशी संवाद साधून त्यांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना करताना दिसत आहे. एक राज्याचा प्रमुख म्हणून राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीत जनतेची संपूर्ण काळजी घेणारे मुख्यमंत्री म्हणून आज सर्वत्र उद्धव ठाकरे यांचे कौतुक होताना दिसत आहे.

त्यांनी एखाद्या लढवय्या सेनापती प्रमाणे प्रत्येक परिस्थितीला लढा देण्याचे ठरवले आणि पाहता पाहता संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या बाजूने उभा राहिला. कोरोनाचे संकट आणि त्यामुळे नागिरकांमध्ये निर्माण होणारी भीती त्यांनी जाणली आणि त्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी त्यांनी स्वतःच्या कुटुंबीयांप्रमाणे काळजी घेण्याचे ठरवले. तसेच त्यासाठी कडक सूचना देखील दिल्या.

बाकीच्या देशांनी केलेल्या चुकांचा अभ्यास करून, आपल्या राज्यातील जनतेकडून या चुका होऊ नये यासाठी आवश्यक अशा सर्व उपाययोजना केल्या आहेत.

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्ला चढविला होता, की प्रशासनाचा कोणताही अनुभव नसताना उद्धव ठाकरे कसे काय राज्याचा कारभार चालवू शकतात, अशी टीका विरोधकांनी केली होती. परंतु मागील १०० दिवसात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या धडाडीच्या निर्णयामुळे, कोरोना संसर्ग अशा भयानक परिस्थितीला अभ्यासपूर्वक, संयमाने हाताळणे या सर्व गोष्टीमुळे संपूर्ण राज्यातील जनतेकडून नाही तर विरोधकांकडून सुद्धा मुख्यमंत्र्यांचे कौतुक होत होते.

आज राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीत राज्याच्या जनतेच्या हिताचे अनेक निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले. जसे कलम १४४, संचारबंदी, सरकरी आणि निमसरकरी, खाजगी कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’, अंतर्गत राज्याच्या सीमा देखील मुख्यमंत्र्यांनी सील केल्या. या घेतलेल्या निर्णयामुळे कोरोना विषाणूचा फैलाव होणे अटोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आरोग्याच्या बाबतीत सुद्धा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी वेळोवेळी चर्चा करून त्या संबंधात निर्णय मुख्यमंत्री घेताना दिसत आहे.

ना फालतू आरडाओरड, ना फाजील आत्मविश्वास, ना फोटो सेशन, ना खोटे आकडे, ना प्रमाणापेक्षा जास्त सुरक्षा, ना कामाच्या जाहिराती, तसेच तोंडाला मास्क लावून आणि हेलिकॉप्टरने पाहणी करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नव्हेत. अभिमान आहे आम्हाला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा असे कौतुक आज मुख्यमंत्र्यांचे सर्वत्र जनतेकडून होत आहे.

पूर्वी महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या हाती एक अदृश्य पण बलशाली रिमोट कंट्रोल असायचे. तेच रिमोट कंट्रोल आज ठाकरेंनी अबाधित ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी त्याचा वापर केल्याचे आजच्या एकंदरीत परिस्थिती व त्यांनी घेतलेल्या निर्णयांमधून दिसून येत आहे. महाराष्ट्रावर आलेल्या प्रत्येक संकटाला ज्यापद्धतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे परतवायचे त्याच सक्षमतेने उद्धव ठाकरे कोरोना विरुद्ध लढा देताना दिसून येत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उत्कृष्ट कर्यशैलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सलाम त्यांच्या कार्याला!!

Leave a comment

0.0/5