Skip to content Skip to footer

कोरोना अपडेट – जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास राहणार खुली, मुख्यमंत्र्यांचे आदेश

कोरोना अपडेट – जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास राहणार खुली, मुख्यमंत्र्यांचे आदेश

कोरोना उपाययोजना संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा येथे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला अनेक महत्वाच्या निर्णयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे वृत्त समोर येत आहे. तसेच या बैठकीत जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने २४ तास सुरु ठेवण्याची मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या देशात १४ एप्रिल पर्यंत लॉक डाउनचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले असल्याने जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे या परिस्थितीतून आरोग्याचा प्रश्न निर्माण होताना दिसून येत होता. याच पार्श्वभूमीवर आता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास खुली ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

Leave a comment

0.0/5