एकाच वेळी लाईट बंद केल्यास ग्रीडमध्ये होऊ शकतो बदल…

ezgif-7-49248aa4a6a5/ग्रीडमध्ये होऊ शकतो बदल
कोरोनाशी लढा देण्यासाठी येत्या रविवारी सायंकाळी 9 वाजता घरातील लाईट बंद करून दिवे आणि मेणबत्ती पेटवण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व जनतेला दिला आहे. परंतु मोदी यांच्या या सल्ल्यानंतर सर्वच स्थरातून मोदींवर टीका होताना दिसत आहे तर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी एकत्रित लाईट बंद केल्याने होणारा परिणामाची आठवण करून दिलेली आहे.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, ग्रीडमध्ये अचानक विजेची मागणी वाढल्यास किंवा कमी झाल्यास फ्रिक्वेन्सीमध्ये अनावश्यक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून जनतेने काळजीपूर्वक विचार करावा आणि आवश्यक तितके लाईट चालू ठेऊन, दिवे लावावेत, असा सल्ला राऊत यांनी दिलेला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here