विना मास्क मंत्रालयात ” NO ENTRY”

Untitled design (3)/C:\Users\INFINITY\Downloads

मंत्रालयातील सर्वच कर्मचाऱ्यांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही महिने मास्कशिवाय मंत्रालयात प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने कळविले आहे. सध्या देशात आणि राज्यात कोरोना रुगांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे देशात 21 दिवसाचा लॉकडाउन जाहिर करण्यात आलेला आहे परंतु या लॉक डाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवांना मात्र वगळण्यात आले आहे. त्यातच आता मांत्रालयात सुद्धा विना मास्क प्रवेश देणार नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून या सूचनेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांनी पालन करून मंत्रालयात मास्क लावूनच प्रवेश करावा अन्यथा त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here