Skip to content Skip to footer

‘असा विनयशील नेता पाहिला नाही!’ वरळीकरांच्या मनाला भावली त्यांच्या आमदाराची विनम्रता…

‘असा विनयशील नेता पाहिला नाही!’ वरळीकरांच्या मनाला भावली त्यांच्या आमदाराची विनम्रता…

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यात शासन आणि महानगर पालिका युद्ध पातळीवर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. असे प्रयत्न सुरू असताना वरळीतील पोद्दार हॉस्पिटल मधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांकडून हॉस्पिटल मधील सुविधांबाबत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची तात्काळ दखल पर्यावरण मंत्री तथा वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी घेतली व संबंधित रुग्णांना दुसर्‍या सुरक्षित जागी स्थलांतरित करुन दिलासा दिला.

तसेच या गैरसोयीसाठी जबाबदार व्यक्तिवरती देखील दंडात्मक कार्यवाही केली जेणेकरुन भविष्यात अशा प्रकारच्या घटनांच्या पुनरावृत्तीस चाप बसेल. ह्या क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांनी देखील त्वरित पावले उचलल्याबद्दल समाधान व्यक्त केले. समाज माध्यमावर सदर बाबीसंदर्भातील कार्यवाहीची माहिती देतानाच आदित्य ठाकरे यांनी असे प्रकार पुन्हा घडणार नाही याची दक्षता बाळगली जाईल याची ग्वाही दिली.

 

असा-विनयशील-नेता-पाहिला-न-Such a modest-leader-saw-no

सदर बाबीचा राजकारण खेळण्यासाठी उपयोग करण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नास सकारात्मक समाजकारणाने उत्तर देणार्‍या आदित्य ठाकरे यांच्या जबाबदार, संवेदनशील वागणूकीने आणि साधेपणाने वरळीकरांची मने जिंकून घेतली. आज तीन कॅबिनेट खात्यांचा कारभार सांभाळतानाच या जागतिक आपत्तीच्या राज्यपातळीवरील व्यवस्थापनात आदित्य ठाकरे अविश्रांत, अहोरात्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत, हे सर्वश्रुत आहे. परंतु या व्यस्त दिनक्रमात देखील आदित्य ठाकरे यांचे आपल्या मतदारसंघावर पूर्ण लक्ष आहे याची पुन:श्च सर्वांना प्रचिती आली. प्रगल्भता ही वयावर नाही तर वृत्तीवर अवलंबुन असते, हे आदित्य ठाकरे यांनी वारंवार सिद्ध केले आहे. या सर्व घटनाक्रमातील अपारंपारिक व वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे नेत्यांमध्ये अभावानेच आढळणारा सद्गुण ‘विनम्रता’!

खरे तर चोवीस तास धावणारी मुंबई अचानकपणे पूर्ण थांबेल हे अविश्वसनीय. परंतु आज हे आक्रित घडले आहे, कोरोना महामारीच्या वैश्विक आपत्तीमुळे. त्यात बाहेरुन येणारे लोंढे, मुंबई आर्थिक राजधानी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय दळणवळणाच्या केंद्रस्थानी असणे, शहरावरती असलेला अतिरिक्त ताण, भौगोलिक स्थिती या सर्व बाबींमुळे महाराष्ट्रात स्वाभाविकच अधिक रुग्णसंख्या आहे. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तसेच अपुर्‍या कर्मचार्‍यांच्या जोरावर अख्ख्या राज्याचा गाडा ओढण्याचे शिवधनुष्य सरकार लिलया पेलत आहे आणि काही नागरिकांना थोड्या फार गैरसोयींचा सामना करावा लागणे अपरिहार्य आहे, हे समजण्याइतकी महाराष्ट्रातील जनता देखील प्रगल्भ आहे.

प्रशासन सर्व आघाड्यांवर तातडीने प्रत्येकाच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यात सजग आहे हे देखील जनता अनुभवत आहे. परंतु असे असताना देखील आदित्य ठाकरे यांच्यासारख्या आघाडीच्या नेत्याने समस्येचे त्वरित निराकरण केलेच. परंतु संबंधित लोकांशी स्वतः संपर्क साधून चूक केलेल्या व्यक्तीच्या वतीने माफी मागितली व त्यांना भविष्यात कधी गरज भासल्यास संपर्क साधता यावा यासाठी त्यांना स्वत:चा संपर्क क्रमांक दिला. देश पातळीवर स्वत:च्या समाजकार्याचा व बुद्धिमत्तेचा ठसा उमटविणार्‍या ह्या तरुण नेत्याची विनयशीलता बघुन वरळीकरांचे मन भरुन आले आहे. ह्या जागतिक आपत्तीमध्ये आम्हीं ठामपणे सरकारसोबत उभे आहोत अशा आशयाचे संदेश त्यांनी समाजमाध्यमांवर शेअर करुन भावना व्यक्त केल्या.

Leave a comment

0.0/5