Skip to content Skip to footer

राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये ! – संजय राऊत

राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये ! – संजय राऊत

राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, असे ट्विट करत सामनाचे कार्यकारी संपादक तथा खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. सध्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री अजूनही कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना सहा महिन्यात सदस्य होणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. तथापि या प्रस्तावावर राज्यपालांनी अजूनही हिरवा कंदील दाखवलेला नाही.

याच पार्श्वभूमीवर अप्रत्यक्षरित्या राज्यपाल आणि भाजपवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी सूचक भाषेत ट्विट करत राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, असे म्हटले आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!

Leave a comment

0.0/5