मिशन बिगिन अगेनचे नियम पाळत, राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला !

hyderabad-lockdown-_EPS/राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन म्हणत राज्यात पुन्हा ३१ जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. राज्यात १ जून ते ३० जून पर्यंत जे नियम लागू होते तेच नियम पुढे तसेच राहणार

मिशन बिगिन अगेनचे नियम पाळत, राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला !

राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन म्हणत राज्यात पुन्हा ३१ जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. राज्यात १ जून ते ३० जून पर्यंत जे नियम लागू होते तेच नियम पुढे तसेच राहणार आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणाऱ्या वाढीमुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करणार नसल्याचे सांगितले आहे.

सध्या राज्यात हळूहळू शिथिलता आणली जाईल असं त्यांनी जनतेला संबोधित करत असताना म्हटलं होतं. त्यामुळे मिशन बिगीन अगेनचा दुसरा टप्पा राज्यात सुरु झाला आहे. राज्यात कोरोनाच्या संख्येत दररोज ५००० हजार रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे हा सरकारसाठी चिंतेचा विषय बनत चालला आहे. यावर सरकारने फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसेच कार्यालयात जाणाऱ्यांनाच लांबचा प्रवास करता येणार आहे. शॉपिंगसाठी जवळच्या मार्केटपर्यंत जाता येणार आहे. मात्र मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं सक्तिचे असणार आहे, असे प्रमुख निर्बंध लावले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here