मुंबईत रुग्ण वाढले, आता २ किमीच्या आत करा खरेदी..!

मुंबईत-रुग्ण-वाढले-आता-२-क-In Mumbai, the number of patients has increased

मुंबईत रुग्ण वाढले, आता २ किमीच्या आत करा खरेदी..!

राज्यात दररोज आज २००० च्यावर रुग्ण सापडत असल्यामुळे डॉक्टरांबरोबर पोलिसांची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी २ किमीच्या आताच अत्यावश्यक सेवेची खरेदी करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले असले, तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

केवळ कार्यालयात जाण्यासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात जाण्यासाठी सामान्य माणसांना दोन किलोमीटर पर्यंतच्या परिसरात प्रवास करण्यासा परवानगी आहे. तसेच दोन किलोमीटरच्या बाहेर जाऊन खरेदी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे असं मुंबई पोलिसांचे प्रवक्ते प्रणय अशोक यांनी सांगितले आहे. मुंबईकर वाहने घेऊन पिकनिकसाठी घराबाहेर पडताना दिसत असल्याचे चित्रं दिसू लागल्याने पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी व्यायाम करण्यासाठी नागरिकांना मोकळ्या मैदानात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र दोन किलोमीटरच्या आतील मोकळ्या मैदानातच नागरिकांना व्यायाम करावा लागणार आहे. त्यापलिकडे त्यांना जाता येणार नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईकरांनी घराबाहेर पडताना मास्क लावावा, गरज असेल तरच घराबाहेर पडावे, अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडणं टाळा, तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा केलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here