आषाढी पासून कोरोना नष्ट होवो, मुख्यमंत्र्यांचे विठूरायाकडे साकडे

आषाढी-पासून-कोरोना-नष्ट-ह- Ashadhi-from-corona-destroyed-h

आषाढी पासून कोरोना नष्ट होवो, मुख्यमंत्र्यांचे विठूरायाकडे साकडे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी एकादशी सध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत मानाचे वारकरी आणि मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यंदा मानाचे वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मान मिळाला.
                  आषाढी एकादशीपासून करोनाचे संकट नष्ट होऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी घातले.  विठुमाऊलीसमोर इथे कुणी मुख्यमंत्री नाही, कुणी अधिकारी नाही, सर्वजण एकसारखे आहेत. विठ्ठल पूजेचा मान मला कधी मिळेल आणि अशा परिस्थितीत महापूजा होईल, याचा कधीही विचार केला नव्हता. केवळ महाराष्ट्राच्या नव्हे, तर विश्वाच्यावतीने माऊलीचरणी साकडे घातले आहे. लवकरात लवकर नव्हे, तर आषाढी एकादशीपासून करोनाचे संकट नष्ट होवो. जगाला पुन्हा एकदा आनंदी, मोकळे आणि निरोगी जीवन जगण्याचे भाग्य प्राप्त होवो, अशी प्रार्थना उद्धव ठाकरे यांनी केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here