अभिताभ बच्चन यांनी दिल्या मराठीतून विठ्ठलमय शुभेच्छा !

अभिताभ-बच्चन-यांनी-दिल्य-Given by Abhitabh-Bachchan

अभिताभ बच्चन यांनी दिल्या मराठीतून विठ्ठलमय शुभेच्छा !

सिनेअभिनेता अभिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांना आषाढी एकादशी निमित्त मराठीतुन शुभेच्छा दिल्या आहेत. आज आषाढी एकादशी निमित्त सर्व राज्यभरात वातावरण विठ्ठलमय झाले आहे. मात्र या आषाढी एकादशीवर कोरोना संसर्गाचे संकट साचलेले दिसून येत आहे. त्यामुळे यंदाची वारी देखील रद्द करण्यात आली आहे.

अमिताभ यांनी आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा देताना विठ्ठल रखुमाईचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. ‘देवशयनी #आषाढीएकादशी निमित्त सर्व भाविकांना, भक्तांना, वारकरी बांधवांना विठ्ठलमय शुभेच्छा !!’, असं कॅप्शनही त्यांनी दिलं आहे. बिग बी प्रत्येक आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा देतात. तसेच इतर दिवशीही विठ्ठल रखुमाईच्या मंदिरातील फोटो शेअर करताना दिसतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here