Skip to content Skip to footer

लालबागचा राजा मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत !

लालबागचा राजा मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत !

कोरोनाच्या वाढत्या संकटात यंदा लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय आज घेतला आहे. मंडळाच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. यासंदर्भात ट्विटवरुन प्रतिक्रिया व्यक्त करताना मंडळाच्या या निर्णयामुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळणार असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा न करता आरोग्य उत्सव साजरा करण्यावर मंडळाच्या बैठकीत एकमत झाल्याचे सांगण्यात आले. तसेच “यंदा राजाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार नाही”, असेही लालबागचा राजा मंडळाचे सुधीर साळवी यांनी स्पष्ट केले होते. ११ दिवस गणपती बाप्पाची मूर्ती न बसवता या ११ दिवसांमध्ये रक्तदान शिबिरे तसेच प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

Leave a comment

0.0/5