‘साहेब माझा विठ्ठल’, पुढील एक महिना पाहायला मिळणार ‘ही’ सिरीज – जितेंद्र आव्हाड आणणार पवारांवर सीरीज ?

‘साहेब माझा विठ्ठल’, पुढील एक महिना पाहायला मिळणार ‘ही’ सिरीज – जितेंद्र आव्हाड आणणार पवारांवर सीरीज ?

गृहराज्य मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर असलेले प्रेम सर्वश्रुत आहे. शरद पवारांवर असलेल्या याच प्रेमाखातीर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुढचा १ महिना शरद पवारांनी गेल्या ५० वर्षांत केलेली कामे व त्याची गोष्ट एका खास सिरीजच्या माध्यमातून सांगणार असल्याची घोषणा केली आहे.

आषाढी एकादशीच निमित्त साधत जितेंद्र आव्हाडांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी या संदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे. साहेबांबद्दल समज गैरसमज खूप पसरवले गेले. स्पेशली कुजबुज मोहीम आणि मीडियाने त्यांना प्रचंड बदनाम केलं असल्याचं आव्हाडांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

देशासाठी, राज्यासाठी, राज्यातील महिलांसाठी जे ५० वर्षात काम केले आहे, ते पूर्णपणे दुर्लक्षित केले जाते. सोबतच साहेबांनी देखील केलेल्या कामाचं कधी मार्केटिंग केलं नाही. आजच्या अंबाणीच्या सेल्समनसारखा काहीच न करता नुसती जाहिरातबाजी साहेबांनी केली नाही. साहेब ज्या ठिकाणी होते तिथे त्यांनी आपलं काम, आपलं कर्तव्य आणि देशसेवा समजून केलं होत आणि करत आहेत, असं आव्हाड म्हणाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here