पारनेरचे नगरसेवक राष्ट्र्वादीत गेले म्हणजे अजित पवारांनी फोडले असे होत नाही -संजय राऊत

पारनेरचे-नगरसेवक-राष्ट्र- Parner's-corporator-nation

पारनेरचे नगरसेवक राष्ट्र्वादीत गेले म्हणजे अजित पवारांनी फोडले असे होत नाही -संजय राऊत
              पारनेर येथील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला होता. याच प्रवेशावरून विरोधकांनी राष्ट्रवादी आणि सेनेला लक्ष केले होते. मात्र या पक्षप्रवेशावर खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे.
             पारनेरचे नगरसेवक राष्ट्रवादीत गेले, याचा अर्थ ते अजित पवारांनी फोडले असा होत नाही, ते पूर्णपणे स्थानिक राजकारण आहे असे राऊत म्हणाले पुढे बोलताना आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल आहे असे सुद्धा पत्रकार परिषदेत बोलून दाखविले.
              मुख्यमंत्र्यांचे सर्व बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष आहे. महाविकास आघाडीच्या नेतृत्वात मतभेद नाहीत. देवेंद्र फडणवीस जे शब्द वापरत आहेत त्या शब्दांचा अर्थ तितकासा खरा नाही, तीन प्रमुख पक्षांनी हे सरकार बनवलं आहे, ही खिचडी नाही, असे उत्तर राऊत यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना दिलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here