मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला, फडणवीसांना टोला

मी-पुन्हा-येईन-हा-चेष्टेच- I'll just come back

मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला, फडणवीसांना टोला
सामनाचे कार्यकारी संपादक तथा खासदार संजय राऊतांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची अडीज तास मुलाखत घेतली ही मुलाखत तीन भागांमध्ये दाखवण्यात येणार आहे. या टीझरच्या पहिल्या मुलाखतीत पुन्हा एकदा शरद पवारांनी विरोधी पक्षनेते फडणवीसांना चिमटा काढला आहे.
 शिवसेना नसती तर भाजपचे ४०-५० आमदारच असते. “मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन” हा चेष्टेचा विषय झाला आहे. राजकीय नेत्याने जनतेला कधीच गृहीत धरु नये. भाजपाचे आता आम्हीच हे लोकांना आवडले नाही असा टोला पवारांनी फडणवीसांना हाणला आहे.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाली की, १०५ आमदार निवडणून आणण्यात शिवसेना पक्षाचे फार मोठे योगदान आहे. शिवसेनासोबत नसती तर १०५ चा आकडा ४०-५० असता. बाळासाहेबांचा विचार, कामाची पद्धत भाजपशी सुसंगत नव्हती.

 बाळासाहेबांची भूमिका आणि भाजपाची पद्धत यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बाळासाहेबांनी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजनांचा सन्मान केला. बाळासाहेबांची भाजपसोबतची युती व्यक्तिसापेक्ष होती असे सुद्धा मुलाखतीत पवारांनी बोलून दाखविले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here