फडणवीसांचे राजकीय बाल-बच्चेही सुखात राहोत – सामना

फडणवीसांचे-राजकीय-बाल-बच- Fadnavis-political-child-escape

फडणवीसांचे राजकीय बाल-बच्चेही सुखात राहोत – सामना

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार चिमटा काढला आहे. दोनच दिवसांपूर्वी फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या संवादाचा ऑडिओ सोशल मीडियावर फिरत होता. त्यात जर मला करोना झाला तर खासगी रुग्णालयात भरती करू नका. मुंबईत सरकारी रुग्णालयातच भरती करा,’ अशी भावना फडणवीसांनी महाजन यांच्याकडे व्यक्त केली होती. या वक्तव्यावरून सामनातून फडणवीसांना समाचार घेण्यात आलेला आहे.

राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर विरोधी पक्षनेते समाधानी आहेत. तशा त्यांच्या भावना त्यांनी मोकळेपणाने व्यक्त केल्या. राज्याच्या आरोग्य यंत्रणेला आणखी काय हवे?, असे सांगत फडणवीसांना करोना वगैरे होऊ नये. त्यांना उदंड, निरोगी दीर्घायुष्य लाभोच, त्यांचे बाल-बच्चे व राजकीय बगलबच्चेही सुखात राहोत ही आमच्यासारख्यांची ईश्वरचरणी प्रार्थना आहे, असा टोला सामनातून हाणला आहे.

विरोधी पक्षनेत्यांनी राज्यातील डॉक्टर, परिचारिका यांच्यावर विश्वास व्यक्त केला. आपल्याला काही झाले तरी हीच सरकारी यंत्रणा सुखरूप ठेवेल हा त्यांचा आत्मविश्वास सरकारला व हजारो करोनाग्रस्तांना बळ देणारा आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक तरी किती करावे? नव्हे, ते करायलाच हवे, असेही सामनातून म्हंटले आहे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here