कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार सुनील राऊत यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार सुनील राऊत यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

             सध्या कोरोनामुळे राज्यात मोठे संकट उभे थाटले आहे. त्यात दररोज कोरोना रुग्नांची वाढती संख्या संकटात अधिकच भर घालत आहे. याच पार्श्वभूमीवर विक्रोळी मतदार संघाचे आमदार सुनील राऊत यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी आपल्या फेसबुक वरून कार्यकर्त्यांना आणि शुभचिंतकांना आवाहन केले आहे.

            माझी तमाम शिवसैनिक, मित्रमंडळ आणि हितचिंतकांना विनंती आहे की, २० जुलैला माझा वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी माझा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरविले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा स्वीकारू शकत नाही. मात्र कोरोनाच्या पाश्वभूमीवर आपल्या सर्वांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने हे गरजेचे आहे.

              आजवरच्या माझ्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीस आपल्या शुभेच्छा आशीर्वाद सदैव सोबत राहिल्या आणि पुढेही राहातील असा मला विश्वास आहे. प्रशासनाच्या नियमांचे पालन करून आपण प्रशासनाला सहकार्य करूया. तुम्ही सर्वजण कोरोनापासून स्वतःची कायजी घ्या, हीच माझ्या वाढदिवसाची भेट असेल असे आवाहन आमदार राऊत यांनी कार्यकर्ते आणि शुभचिंतकांना केले आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here