राष्ट्रवादी-काँग्रेसने युवासेनेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मंत्री आदित्य ठाकरे यांनी मानले आभार !!

राष्ट्रवादी-काँग्रेसने युवासेनेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मंत्री आदित्य ठाकरे यांनी मानले आभार !!

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने विद्यापीठांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र युजीसी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व केंद्र सरकारच्या परीक्षा घेण्याच्या भूमिकांविरोधात युवासेना आक्रमक झालेली असून, त्या विरोधात रिट पीटीशन दाखल केले आहे.

युजीसीने कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांच्या विरोधात घेतलेल्या निर्णयाला युवासेनेने आक्षेप घेतला आहे. युवासेनेच्या या निर्णयाला आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने सुद्धा आपला पाठिंबा दर्शवला आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी देखील युवासेनेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

तसेच युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेणे म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे”, अशी टीका करत युवासेनेला पाठिंबा दर्शवला आहे. यावर आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले आहे.

 

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here