Skip to content Skip to footer

राज्यसभेच्या खासदारांचा शपथविधी, शरद पवार, प्रियांका चतुर्वेदी घेणार शपथ

राज्यसभेच्या खासदारांचा शपथविधी, शरद पवार, प्रियांका चतुर्वेदी घेणार शपथ

                 राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज दिल्ली येथे पार पडणार आहे. सकाळी अकरा वाजता राज्यसभा सदनात हा सोहळा पार पडेल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी खासदारकीची शपथ घेणार आहे.

              महाराष्ट्राच्या कोट्यातील राज्यसभेच्या सात जागा २ एप्रिलला रिक्त झाल्या होत्या. यात महाविकास आघाडीला ४ जागा मिळणार होत्या. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा निश्चित झाल्यानंतर चौथ्या जागेवर राष्ट्रवादीच्या माजी मंत्री फौजिया खान यांचे नाव निश्चित करण्यात आले होते.

Leave a comment

0.0/5