मी निराशावादी नाही – उद्धव ठाकरे

I-pessimist-no-thakre
मी निराशावादी नाही – उद्धव ठाकरे
              मी निराशावादी नाही आणि कोणाला होऊ सुद्धा देणार नाही असे ठाम मत शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या “सामना”ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. या मुलाखतीचा तिसरा ट्रेलर आज सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवरून प्रसिद्द केला आहे.
                यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून सामनाला अनेक मुलाखती दिल्या आहेत. मात्र राज्याचा कारभार हाती स्वीकारल्यानंतर प्रथमच त्यांनी सामनाला ही मुलाखत दिलेली आहे. येत्या शनिवारी आणि रविवारी अशा दोन भागांमध्ये ही मुलाखत दाखवण्यात येणार आहे.

या मुलाखतीत शिवसेनेने भाजपाशी दुरावा आल्यानंतर राष्ट्रवादी-काँग्रेस बरोबर हातमिळवणी केल्यानंतर प्रशासनाचा कोणताही अनुभव नसलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्याचा कारभार आला. त्यात कारभार स्वीकारताच संपूर्ण राज्यावर कोरोना रूपाने मोठे संकट उभे थाटले. त्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरे यांच्यासाठी सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. आता या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांकडे अपेक्षित आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here