पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावे – दादा भुसे

पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावे – दादा भुसे

पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावे तसेच शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिले आहे. ते नंदूरबार जिल्हाधीकारी कार्यलयात आयोजित केलेल्या कृषी विभागाच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना कृषी मंत्री म्हणाली की, शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळावे आणि तो या संकटातून सावरावा यासाठी महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. तसेच बँकांनी कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने बँकांनी सहकार्याची भूमीका घेऊन ग्रामीण शेतकऱ्यांना मदत करावी व वेळेवर कर्ज उपलब्ध करून द्यावे.

युरियाचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे विनंती केली आहे. शासन स्तरावर त्याबाबत प्रयत्न होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे काही ठिकाणी वाहतूकीस विलंब होत आहे. मात्र येत्या आठवड्यात खताचा पुरवठा सुरळीत होईल व जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.असेही यावेळी कृषी मंत्र्यांनी बोलून दाखविले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here