Skip to content Skip to footer

देवेंद्रजी कदाचित तुम्हाला WHO मार्गदर्शनाला बोलावतील ! – मुख्यमंत्री 

देवेंद्रजी कदाचित तुम्हाला WHO मार्गदर्शनाला बोलावतील ! – मुख्यमंत्री  
       

            आज एबीपी माझा या वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत राजीव खांडेकर यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेला प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे.

        राज्यात आज पुरेशा चाचण्या होत नाहीत, महाराष्ट्रात कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढले आहे, कोरोनावर उपाय योजना करण्यात काहीसं अपयश आलंय, असं फडणवीस यांनी एबीपी माझा या वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होते.

          यावर मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. “देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आहेत. बडी आसामी आहे. त्यांना कदाचित WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनाही मार्गदर्शनासाठी बोलावतील”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

Leave a comment

0.0/5