जगात मुंबई मनपाची चर्चा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’कडून धारावी पॅटर्नसह मनपाचे कौतुक

कोरोनाला-रोखण्यासाठी-फिल- Coronala-stop-Phil

जगात मुंबई मनपाची चर्चा, ‘वॉशिंग्टन पोस्ट’कडून धारावी पॅटर्नसह मनपाचे कौतुक
                आता पुन्हा एकदा जागतिक पातळीवर धारावी पॅटर्नसह बृहमुंबई महानगर पालिकेचे कौतुक करण्यात आले आहे. आज मुंबई मनपाने अनेक आव्हानाचा सामना करत मुंबईत कोरोना संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले होते आणि त्यात मुंबई मनपा यशस्वी सुद्धा झालेली दिसून आली होती.
                मुंबई महानगरपालिकेने अत्यंत परिणात्मक कोरोना संसर्गाचा सामना केला, असे गौरवाचे उदगार जागतिक स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित वृतपत्र असलेल्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने काढले होते. कोरोनाचा प्रसार रोखण्याचे मोठं आव्हान जगासमोर असताना आशिया खंडातील सर्वांत मोट्या धारावी झोपडपट्टीत संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात पालिका प्रभावीपणे यशस्वी झाली होती.


           

 मुंबई महानगर पालिकेने कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी उभारलेल्या आरोग्य यंत्रणेचे यापूर्वी अमेरिकेतील अग्रगण्य असलेल्या वॉशिंग्टन वृत्तपत्राने दखल घेत मुंबई मनपाचे कौतुक केले होते. मात्र या कौतूकाला झुकते माप न देता संसर्गाविरोधात लढा अधिक मजबुतीने सुरु ठेवण्याचा निर्धार आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केला आहे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here