Skip to content Skip to footer

अर्णब गोस्वामी माझ्या कुटुंबीयांचा गुन्हेगार आहे, वाचा कोणी लावला आरोप….!

अर्णब गोस्वामी माझ्या कुटुंबीयांचा गुन्हेगार आहे वाचा कोणी लावला आरोप….!
रिपब्लिक न्युज चॅनेलचे प्रधान सचिव अर्णब गोस्वामी यांची पत्रकारिता कारकिर्त वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. त्यात काही दिवसापूर्वी लाईव्ह पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात चुकीचे वक्तव्य करून काँग्रेस कार्यकर्त्यांचा रोष अंगावर ओढावून घेतला होता.
त्यात पुन्हा एकदा सुशांतसिह राजपूत प्रकरणात काडीचाही संबंध नसलेल्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करून राजकीय वातावरण तापवण्याचा राजकीय हेतूस्पद प्रयत्न करताना गोस्वामी दिसत आहे. मात्र आता अर्णब गोस्वामी माझ्या कुटुंबीयांचा गुन्हेगार आहे. माझ्या पतीच्या आणि सासूच्या आत्महत्येला अर्णब गोस्वामीच जबादार आहे असे आरोप एका महिलेने लावले आहे. त्यासंदर्भाचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरताना दिसत आहे.
माझ्या पतीच्या आणि सासूच्या आत्महत्येला अर्णब गोस्वामीच जबादार आहे . माझ्या कुटुंबीयांचा गुन्हेगार आहे. या केससंबंधी मी जागोजागी फिरली पण मला न्याय मिळाला नाही. मी जागोजागी फिरली मला न्याय कधी मिळणार, तो माझ्या कुटुंबीयांचा गुन्हेगार आहे आणि त्याला अटक झालीच पाहिजे. मी सर्व महाराष्ट्रीयांना विनंती करते की, नाईक कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यास आमची सहायता करा. जे लोक सुशांतसिह राजपूतसाठी न्याय मिळवून देण्यासाठी भांडतायत त्यांनी आमच्यासाठी झगडावे असे आवाहन त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.

Leave a comment

0.0/5