बातमी वाचली आणि राखी बांधण्यासाठी आलो…!

बातमी-वाचली-आणि-राखी-बांध- News-read-and-rakhi-dam
बातमी वाचली आणि राखी बांधण्यासाठी आलो
             शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक मोनाक्षी पाटील यांच्याकडून राखी बांधून घेतली. हा सोहळा पाटील यांच्या निवासस्थानी पार पडला होता. या नव्या बहीण-भावाच्या गोड नात्याला रक्षाबंधनाच्या दिवशी सुरवात झाली.
              लोकमत आयोजित “भाव बंधनाचे रेशीम धागे” या कार्क्रमात जिल्हाधीकारी उदय चौधरी, जिल्हा चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी तसेच पोलीस अधीक्षक मोनाक्षी पाटील यांची व्हर्चुअल रक्षाबंधनानिमित्त मते जाणून घेतली होती. या कार्यक्रमात पाटील यांनी मला भाऊ नाही त्यामुळे मी हा सण साजरा करत नाही असे कार्यक्रमात बोलून दाखविले होते.
               पोलीस भावाप्रमाणे जनतेच्या रक्षणाचे काम करतात.त्यात स्त्री-पुरुष असा भेदभाव करत नाही. या भावनेने मी ज्या शहरात आहे. त्या शहरातील लोक मला आवर्जून रक्षाबंधनाला भेटायला येतात आणि राखी बांधून घेतात. त्यांच्या या भावनेला प्रतिसाद देत आमदार अंबादास दानवे यांनी सकाळी अधीक्षक पाटील यांचे घर गाठले.
               तुम्हाला भाऊ नाही असे मी लोकमतमध्ये वाचले. त्यामुळे तुमच्याकडून राखी बांधण्यासाठी आलो आहे. यावर अधीक्षक मोनाक्षी पाटील यांनी आमदार दानवे यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. तसेच हा क्षण पाटील यांच्या पतीने आपल्या कॅमेऱ्यात टिपला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here