भूमिपूजनानंतर मुख्यमंत्री ही अयोध्येला जाणार, शिवसेना मोठ्या थाटामाटात कार्यक्रम करणार ! – संजय राऊत

भूमिपूजनानंतर-मुख्यमंत्- After Bhumi Pujan-Chief Minister

भूमिपूजनानंतर मुख्यमंत्री ही अयोध्येला जाणार, शिवसेना मोठ्या थाटामाटात कार्यक्रम करणार ! – संजय राऊत

              अयोध्या येथे होत असलेल्या राम भूमी पूजन सोहळ्यावर खासदार संजय राऊत यांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र त्यावेळी घुमट काढण्यात शिवसेनेचा मोठा वाटा असल्याचे सांगताना कुणाही याचे श्रेय घेऊ नये, असे सुद्धा ते बोलले. तसेच भूमिपूजनाच्या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा अयोध्याला जाणार आहेत व शिवसेना मोठ्या थाटामाटात उत्सव साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

                   पुढे राऊत म्हणाले की, राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. हा शासकीय कार्यक्रम आहे. आजचा मुहूर्त महत्त्वाचा आहे. साधुसंतांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या मुहूर्तावर भूमिपूजन होत आहे. आजच्या कार्यक्रमाचं श्रेय कोणीही घेऊ नये. कारण हा शासकीय कार्यक्रम आहे. बाळासाहेबांना आणि शिवसेनेला कोणी विसरु शकत नाही. राम मंदिर उभारणीतील त्यांचे योगदान मोठे आहे. अनेकांचे यात योगदान आहे. घुमट काढताना शिवसैनिकांचं मोठं योगदान आहे, असेही सुद्धा राऊत म्हणाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here