Skip to content Skip to footer

भाजपा आमदार राजेश पवार यांचा संतापजनक प्रकार, मतदारांना खालच्या पातळीच्या शिव्या…..!

भाजपा आमदार राजेश पवार यांचा संतापजनक प्रकार, मतदारांना खालच्या पातळीच्या शिव्या…..!

नांदेड येथील भाजपा आमदार राजेश पवार यांचा आपल्या मतदारसंघातील मतदारांशी बोलताना तोल सुटला आहे. अर्वाच्च भाषेत आपल्या मतदारांना शिव्या घालत असलेली त्यांची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे मतदारांना भाजपा आमदार पवार कशाप्रकारे वागणूक देतात हे आता जगजाहीर झालेले आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गात आपण आपल्या मतदार संघात एक फेरी मारलेली नाही. आलं गेलं म्हणजे बरं राहतं, मतदारांच्या अडचणी असतात त्या समजून घेतल्या पाहिजे. मलाच काय आपल्या मतदार संघातील अनेक जनतेच्या समस्या आहेत तुम्ही एकदा चक्कर मारून जा, अशी विनंती नावंदी येथील मतदार मोहनलाल ठाकूर यांनी केली होती.

यावर सरकारने आम्हाला कोठे जाऊ नये, कोरोनाच्या संकटात स्वतःची काळजी घ्या असे सांगितले आहे असे आ. पवार यांनी ठाकूर यांना सांगितले. यावर आपण एक फेरी तरी मारून जा अशी विनंती ठाकूर यांनी आमदार पवार त्यांच्याकड़े केली त्यावर “तुझं काय आहे ते सांग आणि फोन ठेव”, अशा शब्दात ठाकूर यांना ओरडून सांगितले.

      ‘तुझ्या बापाचे गाव आहे का? तू गावाचा मालक आहे का?’

यावर साहेब पुन्हा बी कधीच येऊ नका असे उत्तर ठाकूर यांनी आमदारांना दिले. यावर आमदार पवार यांनी ठाकूर यांना ‘तुझ्या बापाचे गाव आहे का? तू गावाचा मालक आहे का?’ अशा भाषेत सुनावले. तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करून मतदाराचा घोर अपमान केला. या संभाषणाची क्लिप सध्या सर्वत्र फिरताना दिसत आहे आणि मतदारांमध्ये या आमदारांविरोधात असंतोषाचे वातावरण आता वाढत आहे.

Leave a comment

0.0/5