Skip to content Skip to footer

एवढ्या मोठया पावसात मुंबई काय जगातलं कोणतंही शहर तुंबणारच – आयुक्त चहल

एवढ्या मोठया पावसात मुंबई काय जगातलं कोणतंही शहर तुंबणारच – आयुक्त चहल
मागील दोन दिवसापासून मुंबई पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. त्यात अनेक सखल भागात पाणी साचल्याच्या बातम्या सुद्धा प्रसार माध्यमांवर दाखवण्यात आल्या होत्या. यावर बोलताना मनपा आयुक्त इक्बाल चहल यांनी मुंबईत गेल्या ३० वर्षात मी असा पाऊस कधीच पाहिला नाही असे बोलून दाखविले होते.

तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने मुंबईच काय जगातील कोणतंही शहर तुंबणारच, असं सांगतानाच काल मुंबईतील काही भागांत एकप्रकारचे वादळच आले होते, असं मुंबई महापालिकेचे पालिका आयुक्त चहल यांनी सांगितले.
पेडर रोडवरील हँगिग गार्डनजवळ आज भिंत खचून सुमारे ५० वृक्ष उन्मळून पडली होती. त्याची पाहणी करण्यासाठी पालिका आयुक्त चहल आणि मनपाचे अधिकारी आले होते. या पाहणीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

मुंबईत काल ताशी १०१ किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत होते. हे एक प्रकारचे वादळच होते. पण संपूर्ण मुंबईत हे वादळ नव्हतं. दक्षिण मुंबईतच त्याचा प्रभाव होता. वादळ दोन प्रकारचे असतात कालचे वादळ हे त्यापैकी एक होते, अशी माहिती चहल यांनी यावेळी दिली.

Leave a comment

0.0/5