Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल….!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल….!
          मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह टीका-टिपणी करणाऱ्या सुनैना होले नामक महिलेच्या विरोधात मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अटक करून तिला जामिनावर सोडण्यात आले आहे.
         या विरोधात नालासोपारा मधील युवा सेनेचे विभाग अधिकारी रोहन चव्हाण यांनी नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मागील अनेक दिवसापासून होले ट्विटरच्या माध्यमातुन मुख्यमंत्र्यांविरुद्ध बदनामीकारक मजकूर पोस्ट करत होत्या. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये होले विरोधात असंतोषाचे आणि संतापाचे वातावरण पसरले होते.
            मात्र विशेष करून या महिलेला जमीन मिळण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे देवांग दवे यांनी मदत केल्याने सुनैना होले आणि भाजपा संबंध उघड झाले आहेत. दिल्ली भाजपाचे प्रवक्ते ताजिंदर पाल बग्गा यांच्या सांगण्यावरून दवे यांनी मदत केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भाजपा पुन्हा एकदा सरकारला बदनाम करण्यासाठी सोशल वॉरचा वापर करताना दिसून येत आहे. आत भाजपाच्या या नीतीचा सर्व स्थरातून विरोध होताना दिसत आहे.

Leave a comment

0.0/5