सुशांत सिह राजपूत प्रकरणी राजकारण करणे अत्यंत निंदनीय ! – खासदार प्रियंका चतुर्वेदी.

सुशांत-सिह-राजपूत-प्रकरण- Sushant-Singh-Rajput-cas

सुशांत सिह राजपूत प्रकरणी राजकारण करणे अत्यंत निंदनीय ! – खासदार प्रियंका चतुर्वेदी.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन यांनीही सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर आता शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

याबाबत खा. चतुर्वेदी यांनी ट्विटकरत म्हटले आहे की, “राजकारणाशी प्रेरित अशी सीबीआय चौकशीची मागणी नक्कीच उघडकीस आली आहे! बिहारमधील १२ कोटी लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, पूरग्रस्तांना मदत मिळावी, कोरोनातून मुक्तता मिळावी. केंद्र सरकारने जर लक्ष दिले तर ती खरोखर उत्तम सेवा असेल. सुशांत हा आपल्या सर्व भारतीयांना प्रिय होता. त्यांच्या मृत्यूवर राजकारण करणे पाप असल्यासारखेच आहे.”

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here