फेक न्युज संदर्भात कोर्टाचे मोदी सरकारवर ताशोरे….!

फेक न्युज संदर्भात कोर्टाचे मोदी सरकारवर ताशोरे….!

               कोरोनाच्या वाढत्या संसर्गासाठी तबलीकी समाजाला धारेवर धरल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली होती. दिल्लीत झालेल्या तबलीकी कार्यक्रमामुळे देशभरात संसर्ग मोठ्या झपाट्याने वाढला होता, असा आरोप त्यांच्यावर लागवण्यात आला होता. तबलीकी जमात प्रकरणा संदर्भात मीडियाच्या चुकीच्या रिपोर्टिंगवर न्यायालयात एक याचिका दाखल केली गेली. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने थेट केंद्र सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. ‘केंद्र सरकारकडून तेव्हाच कडक पावलं उचलली जातात, जेव्हा त्यांना न्यायालयाकडून निर्देश दिले जातात’, अशी टिप्पणी यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

                 सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठात या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. ‘आमचा असा अनुभव आहे की जेव्हापर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून निर्देश दिले जात नाहीत, तेव्हापर्यंत सरकारकडून काहीही पावले उचलले जात नाहीत’ असे यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here