गुलाबराव पाटलांनी राणे पिता-पुत्रांना सुनावले, गद्दारांच्या यादीत माझं नाव नाही..!

गुलाबराव-पाटलांनी-राणे-Gulabrao-Patlani-Rane

गुलाबराव पाटलांनी राणे पिता-पुत्रांना सुनावले, गद्दारांच्या यादीत माझं नाव नाही..!

‘मी भगव्याच्या धुंदीत आहे. तुम्ही तर भगवा सोडून पळाले, काँग्रेसमध्ये गेले नंतर भाजपामध्ये आले. मी निष्ठावंत आहे. गद्दारांच्या यादीत माझं नाव नाही. त्यामुळे आधी आपण आपली औकात आणि निष्ठा कुठं आहे ती ओळखावी नंतर माझ्या सारख्या कार्यकर्त्यांवर आरोप करावे’, अशी जहरी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी राणे पिता-पुत्रांवर केली आहे.

ट्विटरच्या माध्यमातून नितेश राणे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना पाटील यांनी राणेंवर तोफ डागली आहे. ‘नारायण राणे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा आम्ही त्यांचे पाठीराखे होते. हे त्यांचे पोट्टे तेव्हा बनियानवर असतील आणि आणि त्यांनी मला शिकवू नये’, असेही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

‘मी ३६ वर्ष शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आम्हाला धमक्या देऊ नये आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. राणे यांनी टीका केली आहे की, गुलाबराव कितीवेळा शुद्धीत असतात? अरे मी एका धुंदीत असतो ते म्हणजे भगव्याच्या, मी निष्ठावंत आहे माझं नाव गद्दारांच्या यादीत नाही’, असे सुद्धा पाटील यांनी राणेंना सुनावून दाखविले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here