राजस्थान काँग्रेसमध्ये ‘हा’ मराठी चेहरा ठरला गेम चेंजर…..!

राजस्थान-काँग्रेसमध्ये- In Rajasthan-Congress
राजस्थान काँग्रेसमध्ये ‘हा’ मराठी चेहरा ठरला गेम चेंजर…..!
राजस्थान काँग्रेसमध्ये बंडाचे शंख फुकून काँग्रेस विरोधात भूमिका मांडणारे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आपले बंड आता मागे घेतले आहे. काल त्यांनी काँग्रेस नेते राहून गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर आपले बंड मागे घेत असल्याचे घोषित केले. पायलट यांची ही घोषणा राजस्थामध्ये भाजपाला मोठा धक्का मानाला जात आहे.
मात्र सचिन पायलट यांचे बंड मागे घेण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे व विश्वासू सहकारी म्हणून समजले जाणारे महाराष्ट्रातले राजीव सातव यांनी या प्रकरणात प्रमुख भूमिका निभावलेली आहे. सचिन पायलट यांनी बंड करताच राहुल गांधी यांनी राजीव सातव यांना पायलट यांची समजूत काढण्यासाठी राजस्थानला पाठवले होते. तसेच ते यशस्वी सुद्धा झाले आहेत.
राजीव सातव हे सतत सचिन पायलट यांच्या संपर्कात होते. काँग्रेस पक्ष आणि पायलट यांच्यातील ते दुवा होते. सचिन पायलट यांनी बंड करताच राहुल गांधी यांनी सातव यांना राजस्थानला रवाना होण्याचे आदेश दिले आणि त्यांनी आपली कामगिरी सफल करून दाखवली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here