Skip to content Skip to footer

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद…!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद…!
       महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, आसाम ह्या सहा राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ क़ॉन्फरन्सिंगद्वारा संवाद साधला. यावेळी राज्यावर ओढवलेल्या चक्रीवादळ आणि अतिवृष्टी झालेल्या नुकसानी संदर्भात पंतप्रधानांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी संवाद साधला.
     निसर्ग चक्रीवादळाने राज्यात १ हजार कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे तर काही दिवसापूर्वी चक्रीवादळासह पडलेल्या पावसाने मुंबईत अंदाजे ५०० कोटी पेक्षा अधिक रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे, अशी माहिती देऊन मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे राज्याला लवकरात लवकर मदत जाहीर करण्याची मागणी केली होती. तसेच या मागणीला पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Leave a comment

0.0/5