Skip to content Skip to footer

मनपाच्या “मिशन झीरो” मोहिमेला यश उपनगरातील कोरोना रुग्णसंख्या घटली….!

मनपाच्या “मिशन झीरो” मोहिमेला यश उपनगरातील कोरोना रुग्णसंख्या घटली….!

कोरोनाच्या वाढत्या संसर्गात मुंबई पाठोपाठ उपनगरात सुद्धा कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला होता. मात्र मुंबई मनपाने राबविलेल्या मिशन झिरो मोहिमेमुळे मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात आली होती. आता त्या पाठोपाठ उपनगरातील हॉटस्पॉट ठरलेल्या उत्तर मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येय घट झालेली दिसून येते. त्यामुळे पालिकेच्या मिशन झीरो मोहिमेला मोठे यश आले आहे.

उत्तर मुंबईतील दाटीवाटीच्या झोपडपट्टीत रुग्णसंख्या कमी पण इमारतीमध्ये जास्त रुग्ण सापडत होते. पण पालिकेने उपनगरातील रुग्ण संख्या वाढत आहे, हे लक्षात घेत ‘मिशन झिरो’ मोहिम सुरु केली होती. या चालवलेल्या मोहिमेचा यश आलेले पाहायला मिळाले होते.

उत्तर मुंबईतील रुग्णसंख्या केवळ १५ दिवसात आटोक्यात आली आहे. पालिकेच्या प्रयत्नांना मोठं यश आलं आहे. दहिसर, कांदिवली, बोरिवलीमधील रुग्णसंख्या ३० टक्क्यांनी घटली आहे. हॉटस्पॉटमधील फेरीवाले, भाजीवाले यांच्याही कोरोना चाचण्या झाल्या आहेत. याचाच फायदा उत्तर मुंबईत कोरोना रोखण्यासाठी यश आले आहे.

Leave a comment

0.0/5